Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कर नियोजन नोटबंदीमुळे सुधारल्याचा सीतारामन यांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोटाबंदीमुळे झालेल्या फायद्यांबाबत माहिती दिली. काळ्या पैशांवर अभूतपूर्व हल्ला करणारं पाऊल उचलल्याने चांगलं कर नियोजन आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला उभारी मिळाली.असे त्यांचे म्हणणे आहे

सीतारामन म्हणाल्या, “नोटाबंदीनंतर पहिल्या चार महिन्यांत ९०० कोटी रुपयांची अघोषीत मिळकत जप्त करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या तीन वर्षात ३,९५० कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली. अनेक कोटी रुपयांची अघोषीत मिळकतीचा खुलासा झाला. ऑपरेशन क्लीन मनीमुळे अर्थव्यवस्था औपचारिक बनवण्यास मदत झाली.” , “नोटाबंदीने केवळ पारदर्शकताच आणली नाही तर कराचा परीघ वाढवला. बनवाट चलनावरही अंकुश मिळवता आला.”

दरम्यान, काँग्रेसने दुसरीकडे सोशल मीडियातून नोटाबंदीविरोधात बोलण्याबाबत एक अभियान चालवलं. यामध्ये राहुल गांधी यांनी आरोप केला की, “नोटाबंदीचा मुख्य उद्देश मोठ्या कर्जबुडव्यांचं कर्ज माफ करणं हा होता. नोटाबंदीमुळे जीडीपी वाढीच्या दरात २.२ टक्के घट तर रोजगारामध्ये ३ टक्क्यांनी घट झाली.”

८ नोव्हेंबर २०१६ मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने ५०० आणि १००० रुपयांची कायदेशीर वैधता संपवली होती. त्यानंतर सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती.

Exit mobile version