Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कर नाही तर डर कशाला ? : अतुल भातखळकरांची टीका

मुंबई प्रतिनिधी । ईडीच्या नोटीसीवरून राजकीय धमासान सुरू असतांना भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला खिजवले आहे.

आज संजय राऊत यांनी पत्रकारपरिषद घेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या टीकेला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. या संदर्भात त्यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. यात त्यांनी म्हटले की, संजय राऊतांची आजची पत्रकारपरिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण. केवळ तोंडाच्या वाफा. पुरावे द्या आणि मोकळे व्हा. कर नाही त्याला डर कशाला? परंतु वैफल्यग्रस्ततेने आज त्यांनी अनेक सवंग पद्धतीची विधानं केली. मी तोंड उघडलं तर केंद्र सरकारला हादरे बसतील तुमचं तोंड दाबलयं कुणी? उघडाना तोंड. जे मनात येईल ते बोला. तुमच्या बोलण्याने काही फरक पडणार नाही. त्यामुळे संजय राऊत कर नाही त्याल डर असायचं कारण नाही. थेट पुरावे द्या, ईडीच्या नोटीशीला उत्तर द्या असे ते म्हणाले.

दरम्यान, भातखळकर पुढे म्हणाले की, भाजपावर हेतूवार आरोप करण्याचे धंदे व उद्योग बंद करा. कंपाउंडरकडून औषध घेताय आता एमडी डॉक्टरकडून घ्या, म्हणजे तुमची मनस्थिती थोडी ठीक होईल. असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. तसेच, संजय राऊत आपल्या सवंग राजकीय संस्कृतीचे प्रदर्शन करताय. चांगले आहे लोकांना शिवसेनेची औकात कळते आहे. अशी टीका देखील भातखळकर यांनी केली आहे.

Exit mobile version