Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; आश्रय फाऊंडेशनचा उपक्रम

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील फैजपूर शहरात आश्रय फाऊंडेशन यावलच्या वतीने कतृत्ववान महिलांचा केला सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात वातारणात पार पडला. फैजपुरातील शांती विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात यावल-रावेर तालुक्यातील विविध क्षेत्रात सामाजीक व विधायक कार्य करणाऱ्या १५ महिला व तीन महिला मंडळाचा ही सन्मान करण्यात आला.

 

जागतिक महिला दिन सेवा पंधरवाडानिमित्त नुकतेच फैजपूर शहरात  सन्मान सोहळा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांती विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्यधापिका शुभांगी महाजन या होत्या. तर प्रमुख उपस्थिती मान्यवरांमध्ये आश्रय फाऊंडेशन यावलचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे, उपाध्यक्ष डॉ.विलास पाटील, सचिव डॉ. पराग पाटील, डॉ.राजेश चौधरी, डॉ. दिलीप भटकर, डॉ नितीन महाजन , डॉ. भरत महाजन डॉ. प्रशांत  जावळे डॉ. ताराचंद सावळे, डॉ. निलेश पाटील डॉ.शैलेश खाचणे, डॉ.सोहन महाजन, डॉ.नितीन महाजन, डॉ.ताराचंद सावळे हे होते. या कार्यक्रमात यावल -रावेर तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक व अध्यात्मिक अशा विविध क्षेत्रात कौटुंबिक जबाबदारी अत्यंत सचोटीने पार पाडत उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचा कार्यगौरव करीत त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 

कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून समाजात वावरणाऱ्या गरजूना आपली मदत व्हावी यासाठी सदैव धडपड करणाऱ्या महिलांना आपल्या कार्यात प्रोत्साहन मिळावे यासाठी या उद्देशाने महिलांचा सत्कार करण्यात आला. दैनंदिन जीवनात होत असलेली धडपड विसरून समाजकार्यात स्वतःला झोकून देणाऱ्या महिलांचे कार्य खरोखर मोलाचे असल्याचे मान्यवरानी आपल्या विचारातुन व्यक्त केले. या कार्यक्रमांची प्रस्ताविक आश्रय फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांनी केली तर सूत्रसंचालन फैजपूर येथील शिक्षिका अश्विनी कोळी यांनी केले. या कार्यक्रमात जयश्री प्रदीप पाटील, रुबीना हसन तडवी, प्रिया विश्वास कुवर, धनश्री शिरीष पाटील, वैशाली विलास ताठे, किरण विवेक महाजनी, चंद्रनी अमित समर्थ, जयश्री अनिल पाटील, जयश्री हर्षल बोन्डे, सरला जाहऱ्या बारेला, डॉ.जागृती फेगडे,डॉ स्नेहल जावळे डॉ. भागेश्री महाजन डॉ शीतल पाटील डॉ. सोनम खाचणे डॉ. संगीता महाजन सौं. धनेश्री भटकर डॉ प्रीती सावळे डॉ. वृषाली पाटील  सविता सारिचंद जाधव, तेजन्विनी अजय बढे, हिरकरी विकास पाटील, वंदना रवींद्र महाजन, वैशाली सिद्धार्थ मेढे,गजाला तबस्सुम कमालोध्दीन यांची उपस्थित होती.

 

कार्यक्रमात योगा प्रशिक्षक स्वाती माधव गवई, महिला उद्योजिका प्रतिभा अरुण पाटील, नलिनी चौधरी फैजपूर, वैशाली किशोर सरोदे न्हावी, शालिनी युवराज कोलते न्हावी, होमगार्ड सुलभा चंद्रकांत तळेले, देवका नरेंद्र पाटील न्हावी, शुभांगी अरुण महाजन, आशालता लीलाधर राणे, अश्विनी योगेश कोळी यांचा तर हरी कृष्णा सत्संगी महिला ग्रुप फैजपूर, युवा क्रांती पोलीस मित्र ग्रुप फैजपूर, भक्ती महिला मंडळ फैजपूर या तीन महिला मंडळांचा सन्मान करण्यात आले.

Exit mobile version