Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कर्जबाजारी शेतकऱ्याने विष घेवून संपविली जीवनयात्रा

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सततच्या नापिकीस व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यातील तारखेडा खु” येथील एका ५७ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना घडली असुन घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील तारखेडा खु” येथील शेतकरी रघुनाथ त्रंबक कुंभार (वय – ५७ वर्ष) यांनी सततच्या नापिकीमुळे व कर्जबाजारी झाल्याने तारखेडा शिवारातील शेत गट क्रमांक २४१ / ३ येथे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेबाबत ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांच्या मदतीने रघुनाथ कुंभार यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी रघुनाथ कुंभार यांना मृत घोषित केले. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन मयत रघुनाथ कुंभार यांचे पाश्चात्य पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. रघुनाथ कुंभार यांच्या अकस्मात मृत्युने परिसरात शोककळा पसरली आहे.

Exit mobile version