Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

करोना लसीच्या संशोधनासाठी सरकारकडून ९०० कोटींची तरतूद

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोविड सुरक्षा मिशन’ अंतर्गत संशोधन आणि लस तयार करण्यासाठी केंद्र सरकारनं ९०० कोटी रूपयांची तरतूद केल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली

अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मदतीची घोषणा केली. सरकारनं आत्मनिर्भर भारत ३.०चीदेखील घोषणा केली. याअंतर्गत अर्थमंत्र्यांनी १२ घोषणा केल्या.
देशात कोरोना लस तयार करण्यावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.. स्वदेशी लसीच्या संशोधन आणि विकासित करण्यासाठी अतिरिक्त ९०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोविड सुरक्षा मिशन अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीला ही रक्कम दिली जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाअंतर्गत खर्च केली जाईल.

सरकारनं हेल्थ केअर आणि अन्य २६ क्षेत्रांसाठी क्रेडिट गॅरेंटी स्कीम लाँच केली. कामत समितीच्या शिफारशीनुसार ईसीएलजीएस अंतर्गत लाभ दिला जाणार आहे. मूल रक्कम फेडण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी दिला गेला आहे. तसंच एका वर्षाचा मोरेटोरियमही देण्यात आला आहे. ही योजना ३१ मार्च २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे.

देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी दूरसंचार, वाहन, औषध यांसह १० प्रमुख क्षेंत्रांना उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली. आत्मनिर्भर मॅन्युफॅक्चरिंग बूस्टच्या १.४६ लाख कोटींच्या प्रोडक्शन लिंक्ड इंन्सेटिव्हची घोषणा करण्यात आली.

इमरजन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीमचा (ईसीजीएलएस) कालावधी ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आला आहे. या अंतर्गत कंट्रोल फ्री कर्ज देण्यात येणार आहे. आत्मनिर्भर भारतच्या ESGLS योजनेअंतर्गत ६१ लाख लोकांना आतापर्यंत लाभ झाला आहे.

सरकारनं पंतप्रधान आवास योजनेच्या (शहर) अंतर्गत २०२०-२१ च्या अर्थसंकल्पा्या अतिरिक्त १८ हजार कोटी रूपये उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. यामुळे १२ लाख नव्या घरांच्या उभारणीला सुरूवात आणि १८ लाख घरांचं काम पूर्ण केलं जाणआर आहे. अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या ८ हजार कोटींच्या रकमेव्यतिरिक्त ही रक्कम दिली जाणार आहे. यामुळे ७८ लाखांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्राला दिलासा देण्याचा निर्णय घेतला या क्षेत्रातील कंपन्यांना कॅपिटल आणि बॅक गॅरंटीमध्ये दिलासा देण्यात येणार आहे. परफॉर्मन्स सिक्युरिटीही कमी करून ३ टक्के करण्यात आली आहे. पुढील वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत हा दिलासा देण्यात येणार आहे.

अर्थमंत्र्यांनी विकासक आणि घर खरेदीदारांना कर सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्कल रेट आणि अॅग्रीमेंट व्हॅल्यू यांच्यातील अंतर १० टक्क्यांवरून २० टक्के करण्यात आलं आहे. यामुळे बांधकाम क्षेत्राला चालना मिळणार असून मध्यमवर्गालाही दिलासा मिळणार आहे.

खतांसाठी ६५ हजार कोटी रूपयांचं अनुदान दिलं जाणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. यामुळे १४ कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. पुढील काळात याचा फायदा दिसून येईल. २०१९-२० च्या तुलनेत देशात खतांची विक्री १७.८ टक्क्यांनी वाढली आहे.

पंतप्रधान गरीब रोजगार रोजगार योजनेसाठी १० हजार कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

सरकार एनआयआयएफच्या डेट प्लॅटफॉर्ममध्ये ६ हजार कोटी रूपये इक्विटीच्या रूपात गुंतवणार आहे.

निर्यातीला चालना देण्यासाठी एक्झिम बॅकेला ३ हजार कोटी रूपये लाईन ऑफ क्रेडिटच्या रुपात दिले जातील.

Exit mobile version