करोनाग्रस्तांसाठी बॅडमिंटनपटू सिंधूने राज्यसरकारला दिले १० लाखांची मदत

हैदराबाद वृत्तसंस्था । करोनाची लागण रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी सर्वांना घरी राहण्याचे आवाहन करणारी भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने राज्य सरकारांना १० लाख रुपयांची मदत केली आहे.

सिंधूने आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्य सरकारांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत केली आहे. तिने ही रक्कम मुख्यमंत्री मदत निधीत दिली आहे. ही रक्कम करोना व्हायरसविरुद्धसाठी दिल्याचे तिने सोशल मीडियावरून सांगितले.

करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी अनेक खेळाडू सोशल मीडियावरून लोकांना आवाहन केले आहेत. पण काही खेळाडू आहे ते फक्त आवाहन न करता आर्थिक स्वरुपात मदत करत आहेत. सिंधूच्या आधी दक्षिणेतील सुपरस्टार पवन कल्याण याने दोन कोटी रुपयांची मदत केली होती. त्याने आंध्र आणि तेलंगणा राज्य सरकारांना प्रत्येकी ५० लाख तर केंद्र सरकारला १ कोटींची मदत दिली होती.

Protected Content