Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कराड तालुक्यातील तीर्थ क्षेत्र पालच्या पाणीपुरवठा योजनेला मजुरी

 

मुंबई, :वृत्तसंस्था । श्री क्षेत्र पाल (ता.कराड ) येथील नवीन नळ पाणी पुरवठा योजनेस मंजूरी देण्यात आली योजनेची कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजुरीसाठी आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना दिले

मंत्रालयात आयोजित बैठकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. यावेळी विधानसभा सदस्य महेश राजेशिंदे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य अभियंता चंद्रकांत गजभिये व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ना. गुलाबराव पाटील म्हणाले, श्री क्षेत्र पाल हे प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी असून या ठिकाणी दरवर्षी महाराष्ट्रातून तसेच कर्नाटक व आंध्रप्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. दिवसेंदिवस भाविकांच्या संख्येत वाढ होत असून ग्रामस्थांना व भाविकांना पाण्याची सोय व्हावी यासाठी राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत या योजनेचा समावेश करण्यात आला होता.

राष्ट्रीय कार्यक्रमामधून माणसी 40 लीटर ऐवजी 55 लीटर प्रमाणे योजना राबविण्याची विनंती ग्रामपंचायतीने केली होती. त्यास अनुसरून नवीन नळ पाणी पुरवठा योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे भाविक व ग्रामस्थांना पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी नवीन नळ पाणी पुरवठा योजनेची कामे वेळेत पूर्ण करावीत.

या बैठकीत कोरेगाव तालुक्यातील मौजे खेड, मौजे निगडी तसेच पुसेगाव नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामांबाबत आढावा घेण्यात आला या योजनेची कामे तत्काळ पूर्ण करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश ना .पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Exit mobile version