Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

करंजी येथे शेतकऱ्याच्या घरात चोरी; सव्वा लाखाचा ऐवज लंपास

पारोळा प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील करंजी येथील कापूस वेचणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून रोख रक्कम व सोनेचे दागिने असा एकूण सव्वा लाख रुपये किमतीच्या ऐवज चोरून नेल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

शांताराम लक्ष्‍मण पाटील हा शेतकरी आपला कुटुंबीयांसह आज सकाळी आठ वाजता त्याच्या शेतातील कापूस वेचणी साठी गेला होता. तर मुलगा हा शाळेत गेला होता. सकाळी दहा वाजता मुलगा शाळेतून घरी परतला व तो देखील घराला कुलूप लावून खिडकी चावी ठेवून शेतात कापूस वेचण्यासाठी आला. त्यानंतर तो पुन्हा साडे दहा अकरा वाजेच्या सुमारास घरी परत आला. तर त्याला घराचा दरवाजा हा उघडा दिसला व घरातील सामान कपडे साहित्य हे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्याने वडिलांना ही माहिती दिले कुटुंब हे घरी पोहोचल्यानंतर त्यांनी गोदरेज कपाट कडे धाव घेतली. कपाटाचे लॉक तोडून अनोळखी चोरट्याने एक लाख 22 हजार 697 रुपये किमतीचे सोनेचे दागिने व दोन हजार रुपये रोख असा जवळपास सव्वा लाखाचा ऐवज चोरून वेळेची बाब ही निदर्शनास आली आहे. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय रवींद्र बागुल करीत आहे. दरम्यान या वर्षी अतिवृष्टी ने शेतकरीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचा अज्ञात चोरट्याने सव्वा लाखाचा ऐवज लंपास केल्याने हा शेतकरी हवालदिल झाला आहे..

Exit mobile version