Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कमलेश सोनवणे यांची नियुक्ती

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या डी.टी.एड., बीएड स्टुडंट असोसिएशनच्या राज्यस्तरीय सभेमध्ये संस्थापक अध्यक्ष संतोष मगर यांनी पाचोरा येथील कमलेश सोनवणे यांची असोसिएशनच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती केली.

शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार समूळ नष्ट करणे, डी. एड., बी. एड. प्रशिक्षणार्थ्यांना पुढील वाटचालीस मदत करणे या उद्दिष्टांसह संघटना काम करते. कमलेश सोनवणे यांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान तसेच उत्तर महाराष्ट्रातील दांडगा जनसंपर्क बघता त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Exit mobile version