Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कमलनाथ यांची सुप्रीम कोर्टात धाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसच्या स्टार प्रचारकाच्या यादीतून कमलनाथ यांना निवडणूक आयोगानं हटवलं आहे. आयोगाचा हा निर्णय नियमबाह्य असल्याचे सांगत कमलनाथ यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

आचार संहितेचे उल्लंघनकेल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने शुक्रवारी कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेतला होता. त्यांना पोटनिवडणुकीसाठी प्रचार करता येणार नाही असं म्हटलं होतं. त्यांनी प्रचार केला तर त्याचा खर्च संबंधीत उमेदवाराला द्यावा लागले असं आयोगानं म्हटलं होतं.

निवडणूक आयोगाने कमलनाथ यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला असला तरी आपण प्रचार सुरुच ठेवणार असल्याचं कमलनाथ यांनी म्हटंल आहे. आपला आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगताना मी हार मानणार नाही, प्रचार सुरुच ठेवणार असं त्यांनी म्हटलं आहे.

कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेतल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी म्हटलं की, स्टार प्रचारकांची यादी बनवण्याचा अधिकार हा राजकीय पक्षांचा आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाचा नाही. त्यामुळे आयोगाने या आदेशाद्वारे नियमांचे उल्लंघन केले आहे.

Exit mobile version