Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कपडे विक्रेत्या विवाहितेचा विनयभंग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील एका भागात कपडे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विनयभंग करणाऱ्या आसिफ शहा दिलावर शहा रा. फातीमा नगर याच्याविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील एका भागात वास्तव्यास असलेली ३४ वर्षीय विवाहिता एका शहरातील एका मध्यवर्ती असलेल्या मार्केट परिसरात कपडे विक्रीचा व्यवसाय करते. २ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास विवाहितेच्या हातगाडीवर रिक्षाचालक आसिफ शहा दिलावर शहा हा आला, त्याने विवाहितेला मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडीओ दाखवून विवाहितेसोबत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी दुसऱ्या दिवशी ३ एप्रिल रोजी विवाहितेने शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली, या तक्रारीवरुन विनयभंग करणाऱ्या आसिफ शहा दिलावर शहा रा. फातीमा नगर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रविंद्र सोनार हे करीत आहेत.

Exit mobile version