Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कन्नड घाटात ट्रक कोसळला ; चालक जागीच ठार!

 

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । कन्नड घाटाच्या वळणावर भरधाव ट्रकच्या वेगावर नियंत्रण मिळवता न आल्याने ट्रक खोल दरीत कोसळून चालक जागीच ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील कन्नड घाटात ट्रक (क्र. टी.एस-१२ यूसी-८१७०) भरधाव वेगाने जात असताना. वळणावर वेगावर नियंत्रण न मिळवता आल्याने ट्रक खोल दरीत कोसळली. यात चालक शिवराज मलप्पा (वय-३२ रा. जि. बिदर  कर्नाटक) याचा जागीच मृत्यू झाला. क्लिनर सचिन भिमशा हिरबावी यांना दुखापत झाली आहे. हि घटना दि. १६ रोजी सकाळी ४:३० ते ५ वाजेच्या सुमारास घडली असून ग्रामीण पोलीस ठाण्यात क्लिनर सचिन भिमशा हिरबावी यांच्या फिर्यादीवरून  भादवी कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, १८४ नुसार गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास हेकॉ दिलीप रोकडे हे करीत आहेत.

Exit mobile version