Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कत्तलीसाठी बैलांची वाहतूक : दोघांविरोधात गुन्हा दाखल

एरंडोल, प्रतिनिधी येथील मरीमाता चौकात  मंगळवार ३१ ऑगस्ट  रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पाच बैल कत्तलीसाठी नेणारे वाहन एरंडोल पोलिसांनी पकडले.

या जनावरांची किंमत दीड लाख रुपये आहे. एम एच २८ एबी ०४४९ क्रमांकाच्या पिकप गाडीच्या बॉडीला काळ्या रंगाची ताडपत्री लावून अवैधरित्या पाच बैलांची वाहतूक करून कत्तलीसाठी नेत होते अशी माहिती एरंडोल पोलीस स्टेशन सुत्रांनी दिली.  याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला भाग सहा गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर कलम महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५अ (१, प्राणी क्लेश प्रतिबंध कायदा १९६० चे कलम ११(१)(डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल पंकज पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपी शेख लुकमान शेख मुसा व शेख अब्दुल शेख रहीम दोन्ही राहणार स्नेहा नगर सिल्लोड (औरंगाबाद) येथील आहेत. दोन फिक्कट तांबड्या रंगाचे बैल असून तीन पांढऱ्या रंगाचे असे एकूण पाच बैलांसह पिकप वाहन जप्त करण्यात आले आहे.  संतोष चौधरी , पंकज पाटील, राजू पाटील, संदीप सातपुते, अकील मुजावर हे पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

 

Exit mobile version