Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कडधान्य व्यापाऱ्याची ९ लाख ७९ हजारांची फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अयोध्या नगर परिसरातील अशोक नगरात राहणाऱ्या व्यापार्‍याचा विश्वास संपादन करीत त्याच्याकडून वेळोवेळी उधारीने माल खरेदी करीत तब्बल ९ लाख ७९ हजारांचा चूना लावल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी न्यायालयाने आदेश दिल्यानंतर महिलेच्या तक्रारीवरुन मंगळवारी ७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील अयोध्या नगरातील अशोक नगरात मनिषा नंदकिशोर सोमाणी या वासतव्यास असून त्यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटमध्ये कडधान्य विक्रीचा होलसेलचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडून सिताराम घिसुलाल उपाध्याय प्रोप्रायटर विठ्ठल ट्रेडर्स रा. दालफळ, शिवाजी नगर, जळगव यांनी त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून ९ लाख ७९ हजार १६९ रुपयांचा कडधान्याचा माल वेळोवेळी उधारीने खरेदी केला. तसेच त्यांना मालाचे पैसे मागितले असता त्यानी पैसे न देता तुम्हाला मार्केटमध्ये धंदा करु देणार नाही, अशी धमकी देत विश्वासघात करुन व्यापारी महिलेची फसवणुक केली. याबाबत न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने यावर सुनावणी घेत एमआयडीसी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महिलेच्या तक्रारीवरुन मंगळवारी ७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता सिताराम घिसुलाल उपाध्याय याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे करीत आहे.

Exit mobile version