Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा परिषदेसमोर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील कजगाव येथील बसस्थानक परिसरात असलेले अतिक्रमण काढण्यात याव्या, या मागणीसाठी तक्रारदार भूषण पाटील या तरूणाने मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळण्यात यश आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील कजगाव बसस्थानक परिसरात अतिक्रमण करण्यात आलेले आहे. हे अतिक्रमण काढण्याबाबत तक्रारदार भूषण नामदेव पाटील, स्वप्निल प्रल्हाद पाटील, चेतन रवींद्र पाटील आणि जीवन प्रभाकर चव्हाण सर्व रा. कजगाव ता. भडगाव यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, भडगाव तहसील कार्यालय, पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याकडे वारंवार निवेदन तक्रारी व अर्ज केलेले आहे. अतिक्रमण काढण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही, यासंदर्भात यापूर्वी या तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळी देखील खोटे आश्वासने देऊन जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला.  याप्रकरणात अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने मंगळवार २० जून रोजी दुपारी १ वाजता जळगाव जिल्हा परिषद कार्यालयासमोर तक्रारदार भूषण नामदेव पाटील याने आज मंगळवारी २० जून रोजी दुपारी १ वाजता अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला आहे. तरूणांना ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version