Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कचऱ्याच्या आगीमुळे दुचाकीने घेतला पेट

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अंगणातील कचऱ्याला लागेलल्या आगीमुळे उभी दुचाकी जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील चबुत्रे येथे घडली. याबाबत पारोळा पोलीसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती , किशन छगन वंजारी (वय-३८) रा. चबुत्रे ता. पारोळा हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. १७ ऑगस्ट रोजी रात्री त्यांनी त्यांची मालकीची दुचाकी (एमएच १९ डीटी ७४०९) ही पार्किंग करून लावली होती. अंगणात कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे उभी दुचाकीला आस लागली. त्यामुळे दुचाकीने पेट घेतला. यात संपुर्ण दुचाकी जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version