Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कक्ष अधिकारी फक्रुद्दीन शेख यांचा सेवानिवृत्तीनिमित्ताने सत्कार

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कक्ष अधिकारी फक्रुद्दीन शेख यांना सेवानिवृत्तीबद्दल गुरुवार दि.३० जून रोजी प्रभारी प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली निरोप देण्यात आला.

 

कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अधिसभागृहात झालेल्या निरोप समारंभात फक्रुद्दीन शेख यांनी केलेल्या सेवेचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.एस. टी. इंगळे, दुर्योधन साळुंखे, अमृत दाभाडे, महेश पाटील व डॉ.मुनाफ शेख यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर श्री.शेख यांनी सत्काराला उत्तर दिले. यावेळी विद्यापीठाच्या वतीने तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अधिकारी व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, मागावर्गीय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना,बहुजन कर्मचारी संघटना, उमवि कर्मचारी पतपेढी आणि संशोधन विभाग यांच्या वतीने श्री. शेख यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सुनील पाटील यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version