कंत्राटी भरतीची चौकशी करून ७ दिवसात अहवाल सादर करा : सभापती रवींद्र पाटील

जळगाव , प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात  कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेतात  कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती करण्यात आली होती. या भरतीत गैरव्यवहार झाल्याचे सभापती रवींद्र सुर्यभान पाटील यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेवून सभापती पाटील यांनी कंत्राटी भरतीची चौकशी करून ७ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिलेत.

आज जिल्हा परिषदेचे शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांच्या दालनात  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. जमादार, अतिरिक्त जिल्हा अधिकारी डॉ. पांढरे व मिलिंद लोणारीसह संबंधित कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सभापती रवींद्र पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले की, महामारी आजारा संदर्भात आज बऱ्याच पदांची भरती आपल्या जिल्हा परिषदेच्या स्तरावरून करण्यात आलेले आहे व आजपर्यंत ही देखील प्रक्रिया सुरू आहे. मात्र या भरती प्रक्रियेत काही गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी माझ्यापर्यंत प्राप्त झाले आहेत. या सर्व तक्रारींची व  आरोग्य विभागात आलेल्या ऑफलाइन व ऑनलाइन सर्व तक्रारींची चौकशी करून संबंधित अहवाल सात दिवसाच्या आत सादर करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागात आलेल्या तक्रारींची का दाखल घेत नाही अशी विचारणा करून अधिकाऱ्यांनावर रोष व्यक्त केला.

 

Protected Content