Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कंत्राटी कामागारांचे विविध मागण्यांसाठी महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

जळगाव प्रतिनिधी । महावितरण कंपनी कंपनीत ठेकेदारांमार्फत जळगाव जिल्ह्यात काम करणाऱ्या कामगारांना नियुक्तीपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी आयोध्या नगरातील महावितरण कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव विभागीय कार्यालयात नाशिक येथील मामलेदार स्वयंसेवक रोजगार सेवा सहकारी संस्था या एजन्सीच्या माध्यमातून काम देण्यात आलेले आहे. हे काम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेला आहे. परंतू एजन्सी मार्फत काम करणारे कंत्राटी कामगार हे नियुक्तीपत्र नसतांना काम करत आहेत. काम करतांना काही अपघात झाल्यास याला जाबाबदारी कोणाची राहिल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यात अनुभवी कामगारांना त्यांच्या उतारवयात त्यांना घरी बसवण्याचा घाट महावितरण कंपनीमार्फत केला जात आहे. यासंदर्भात या मागणीसाठी यापुर्वी सर्व कामगारांनी महावितरण कंपनीला वेळोवेळी संप केले आहे. कोरोनाकाळात कंत्राटी अनुभवी कामगारांना बेरोजगार करून उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने त्यांच्यावर नियुक्तीपत्र देण्यात यावे अशी मागणी यापूर्वी केली होती. परंतु मागण्या मान्य न झाल्याने आज बुधवार २४ नोव्हेंबर रोजी एम.एस.ई.बी. वर्कर्स युनियनच्या पावर फ्रंट संघटनेच्या माध्यमातून आयोध्या नगरातील महावितरण कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांनी बेमुदत उपोषणाला बसले आहे.

Exit mobile version