कंत्राटी कामगारांचे शोषण थांबणार : डॉ. विवेक सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांच्या पाठपुराव्याने कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण थांबणार आहे.

 

जळगाव जिल्हा परिषद मध्ये कंत्राटी कामगारांना मिळणार किमान वेतन कायद्यानुसार वेतन

 

 

महाराष्ट्रासह सर्वत्र होणारी कामगारांची आर्थिक लूट पाहता शासनाने या सर्व अत्याचारावर निर्बंध यावेत म्हणून किमान वेतन कायदा लागू केलेला आहे. परंतु  जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषद अंतर्गत किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी होत नसून कंत्राटी कामगारांचे मागील काही वर्षांपासून शोषण होत असल्याची तक्रार स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडे केली होती.

 

त्या अनुषंगाने  जिल्हा परिषद प्रशासनाने किमान वेतन कायद्यानुसार कंत्राटांना  वेतन अदा केले जाईल अशी निविदा काढलेली सदर निविदेची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदा केले जाणार आहे आहे. यामुळे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांच्या मागणीच्या अनुषंगाने कंत्राटी कामगारांना न्याय मिळणार आहे.

Protected Content