Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कंटेनरने दुचाकीला उडविले; बाप-लेक ठार !

जळगाव : प्रतिनिधी । भरधाव वेगाने धावणार्‍या कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत बाप-लेक ठार झाल्याची दुर्घटना गुजरात पेट्रोल पंपाजवळ घडली असून  कंटेनरच्या  चालकाला आज अटक करण्यात आली आहे.

 

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पिंप्राळ्यातील रहिवासी नागेश्‍वर पवार (वय ३५) हे आपल्या पाच वर्षाच्या कार्तीक   या मुलासह रात्री नऊच्या सुमारास घरी येत होते. यावेळी भरधाव वेगाने धावणार्‍या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला उडविले. यात या दोन्ही बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला.

 

दरम्यान, कंटेनर चालकाने अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले होते. या अर्जुन कुमार सिंग नावाच्या चालकाला आज अटक करण्यात आली आहे. बाप-लेकाच्या अपघाती मृत्यूमुळे पिंप्राळा परिसरावर शोककळा पसरली आहे.

 

Exit mobile version