Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कंगना रणौतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड

 

 

 

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था । सतत वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौत हिचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.

 

जगातील सर्वाधिक लोकप्रिय माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइटपैकी एक असणाऱ्या ट्विटरने कंगनावर कारवाई करत असल्याचं स्पष्ट केलं आहे.  कंगनाचं अकाऊंट कायमचं बंद करण्यात येत असल्याचंही ट्विटरने स्पष्ट केलं आहे.

 

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कंगनाने काही वादग्रस्त ट्वीट केले होते. सोमवारी  कंगाने केलेल्या या ट्विट्समध्ये अनेक वादग्रस्त आरोप करण्यात आलेले. त्यानंतर आज सकाळी कंगनाचे ट्विटर अकाऊंट वारंवार नियमांचे उल्लंघन करत असल्याचं कारण देत कायमचं बंद करण्यात येत असल्याचं ट्विटरने जाहीर केलं. प्रत्यक्षात एखाद्याला दुखापत करण्यासंदर्भातील वक्तव्य करणं, द्वेष निर्माण करणारी आणि अश्लील तसेच दर्जाहीन भाषा वापरुन टीका करणं हे ट्विटरच्या पॉलिसीनुसार चुकीचं आहे. अशाच काही नियमांचे कंगाने उल्लंघन केल्याचं ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे.

 

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या तृणमूलने विजय मिळवल्यानंतर कंगनाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. बंगालमधील ममतांचा विजय हा रोहिग्यांचा आणि बांगलादेशी मुस्लिमांचा विजय आहे, अशा आशयाचं ट्विट कंगाने पश्चिम बंगालमधील निकालांनंतर केलं होतं. पश्चिम बंगालमधील निवडणुकीचे निकाल रविवारी  लागले  निकालानंतर बंगालमध्ये हिंसक घटना घडल्या त्यासंदर्भातही कंगनाने ट्विट केले होते.

 

 

कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंगनाच्या वक्तव्यांमुळे पश्चिम बंगालमधील लोकांच्या भावना दुखावल्याचे कारण त्यावेळी देण्यात आले होते. कोलकात्याचे पोलिस आयुक्त सौमेन मित्रा यांना वकील सुमित चौधरी यांनी ईमेलद्वारे तक्रार केली होती. कंगनाच्या वक्तव्यांमुळे बंगालमधील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्यांचा अपमान केला आहे, असं सांगत तिच्याविरोधात चौधरी यांनी तक्रार दाखल केलीय.

Exit mobile version