Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कंगनावर काँग्रेसची प्रश्नांची सरबत्ती

 

मुंबई , वृत्तसंस्था । महाविकास आघाडी सरकारसह मुंबई व मुंबई पोलिसांवर टीका करणारी अभिनेत्री कंगना राणावत ही आज मुंबईहून पुन्हा हिमाचल प्रदेशातील आपल्या गावी रवाना झाली. ही संधी साधून आता काँग्रेसनंही टोलेबाजी केली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करून कंगनाला डिवचले आहे. ‘कंगना हिमाचलला गेली हे ऐकून आश्चर्य वाटलं. ड्रग माफिया आणि त्यांच्या बॉलिवूडशी असलेल्या संबंधांबाबत तिला असलेल्या माहितीचं काय? नार्कोटिक्स विभागाला या साऱ्याची माहिती देणं हे तिचं कर्तव्य नाही का? एखाद्या गुन्ह्याविषयीची माहिती स्वत:कडे ठेवणं, ती पोलिसांना न देणं हा भारतीय दंडविधानाच्या कलम २०२ व १७६ अंतर्गत व एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नाही का? की कंगनाकडे असलेली ड्रग माफियांची आणि त्यांच्या बॉलिवूड कनेक्शनची माहिती ही केवळ अफवा होती?,’ अशा प्रश्नांची सरबत्तीच सचिन सावंत यांनी केली आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही कंगनाच्या बाजूने बोलणाऱ्यांना टोला हाणला आहे. ‘तुमची तोंडे काळी करून कंगना गेली, आता मारा बोंबा,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version