Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

औरंग्याचे नाव घेणारांना माफी नाही : फडणवीस

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात औरंगजेबाची भलामण आणि औरंग्याचे नाव घेणारांना माफी नाही अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावले आहे.

 

नवी मुंबईच्या विमानतळाच्या कामाची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

 

या संदर्भात फडणवीस म्हणाले की, औरंगजेबाची भलावण करणार्‍यांना महाराष्ट्रात माफी नाहीच. पोलिस सुद्धा कारवाई करतच आहे. त्याचवेळी जनतेने सुद्धा शांतता पाळावी. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही. ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभागाला दिलेल्या आहेत.

Exit mobile version