Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

औरंगाबाद महापालिका निवडणूक : ‘एमआयएम’चे गुप्त सर्वेक्षण, दहा नगरसेवकांचे तिकीट कापणार

औरंगाबाद (वृत्तसंस्था) आगामी महापालिका निवडणुकीसाठी ‘एमआयएम’ने गुप्त सर्वेक्षण करुन आपल्या नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड तयार केले आहे. त्यानुसार ‘एमआयएम’ आपल्या विद्यमान दहा नगरसेवकांचे तिकीट कापणार असल्याचे वृत्त आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी ‘एमआयएम’ने गुप्त सर्वेक्षण करुन सर्व्हेचा अहवाल ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना सादर करण्यात आला. त्यांच्या सूचनेनुसार दहा नगरसेवकांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. पक्षविरोधी काम, असमाधानकारक कामगिरी आणि मतदारांमधील नाराजी यामुळे दहा विद्यमान नगरसेवकांचा पत्ता कट होण्याचे संकेत आहेत. औरंगाबाद मनसे-भाजप विरुद्ध एमआयएम विरुद्ध शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होईल.

Exit mobile version