Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

औरंगाबाद खंडपीठाचा आ. लता सोनवणे यांना दिलासा

 

अमळनेर, प्रतिनिधी। चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा जात पडताळणी समितीचा आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने रद्द केला असल्याची माहिती आमदारांचे वकील अॅड. भरत वर्मा यांनी दिली.

आमदार लता सोनवणे यांचे कोळी जातीचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरवले होते त्यामुळे त्यांची आमदारकी जाते की काय याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते. मात्र आमदार लता सोनवणे यांनी अॅड. भरत वर्मा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका क्रमांक ७७२१/२० दाखल केली होती. दोन्ही बाजूने युक्तिवाद ऐकून घेतल्यांनातर न्या. गंगापूरवाला व न्या. कुलकर्णी यांनी ३ रोजी निकाल दिला असून जातपडताळणी समितीचा निकाल रद्द करून दाखला फेरचौकशीसाठी परत पाठविण्याचे आदेश दिल्याने आमदार सोनवणे याना तूर्त दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version