Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

औरंगाबादेत ७४ नवे कोरोनाबाधित; रूग्णांची संख्या ८२३

औरंगाबाद वृत्तसंस्था । औरंगाबादमध्ये पुन्हा ७४ नवे करोनाबाधित सापडल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता ८२३ वर पोहचली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत २१ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

 

भारत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत चीनलाही मागे टाकण्याची भीती

गेल्या आठवड्यांपासून औरंगाबाद शहरात बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. औरंगाबादमध्ये काल दिवसभरात ६२ नवे रुग्ण सापडले होते आणि दोघांचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा ७४ नवे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये बुढीलेन, रोशन गेट, संजयनगर, सादातनगर, भीमनगर, वसुंधरा कॉलनी, कैलास नगर, चाऊस कॉलनी, प्रकाश नगर, शिव कॉलनी (गल्ली नं. ५, पुंडलिक नगर), हनुमान नगर, हुसेन नगर, अमर सोसायटी आणि न्यू हनुमान नगर (गल्ली नं.१, दुर्गा माता मंदिर) येथे प्रत्येकी एक, शहरात एन सहा, सिडको येथे, रहेमानिया कॉलनी, भावसिंगपुरा आणि हुसेन कॉलनी (गल्ली नं. ५) येथे प्रत्येकी २, वृंदावन कॉलनी ३, भवानीनगर ४, हिमायत नगर आणि बायजीपुरा येथे प्रत्येकी ५, सिल्कमील कॉलनी ६, न्याय नगर ७, पुंडलिक नगर ८ आणि हुसेन कॉलनीत १५ रुग्ण सापडले आहेत. हुसेन कॉलनीत सर्वाधित १५ रुग्ण सापडल्याने येथील रहिवाश्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पुण्यात रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने ‘कोरोना’ संशयिताची आत्महत्या

आज सापडलेल्या रुग्णांमध्ये पुरुषांप्रमाणेच महिलांचाही अधिक समावेश आहे. यातील बहुतेक रुग्ण झोपडपट्टी परिसरातील असून संपर्कातून त्यांना करोनाची बाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

 

Exit mobile version