Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू !


औरंगाबाद (वृत्तसंस्था)
मागील दोन दिवसांमध्ये औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नितीन साळवे आणि रावसाहेब आमले असे या नगरसेवकांचे नाव आहे. दरम्यान, सलग दोन दिवसात दोन नगरसेवकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

 

 

शिवसेनेचे नगरसेवक रावसाहेब आमले यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना आज प्लाझ्मा थेरपी दिली जाणार होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर आज बुधवारी शिवसेनेचे अन्य एक नगसेवक नितीन साळवे यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. साळवे यांच्यावर मागील ७ दिवसांपासून उपचार सुरु होते. मंगळवारी (७ जुलै) उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, औरंगाबादेत आज १६६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यासह औरंगाबादमधील कोरोना रुग्णांची संख्या ७ हजार ३०० वर पोहचला आहे. तसेच आतापर्यंत ३२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Exit mobile version