Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

औरंगाबादमध्ये आठ दिवसासाठी कडक संचारबंदीची घोषणा

औरंगाबाद (वृत्तसंस्था) कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे १० ते १८ जुलै या कालावधीत कडक संचारबंदीची घोषणा प्रशासनाने केली. या कालावधीत उद्योग, व्यापारसह भाजीपाला, मेडिकलही बंद राहणार आहेत.

 

आज विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या कार्यालयात शहरातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत औरंगाबादमधील वाढत्या करोनाच्या प्रादुर्भावावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा जिल्हाधिकारी चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. जनतेने यास प्रतिसाद द्यावा, घरात बसून सहकार्य करावं, हा प्रशासनाचा कर्फ्यू नसून हा जनतेने स्वत:हून लागू केलेला जनता कर्फ्यू आहे, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले आहे. तसेच संचारबंदीच्या कालावधीत भाजीपाला आणि मेडिकल दुकानेही बंद राहणार असून औषधी पुरवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे. आठ दिवस आपण कडकडीत बंद पाळला तर चित्रं वेगळं दिसेल. विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन चौधरी यांनी केले आहे. दरम्यान, वाळूज परिसरात उद्योग धंद्यांसह एमआयडीसी पूर्ण बंद आहे.

Exit mobile version