Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओव्हरटेक करण्याच्या नादात आयशर बांभोरीनजीक ९० फुट खोल कोसळला (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर बांभोरी जकातनाक्याजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात बांभोरी येथील आयशर ट्रक महामार्गालगत ८० ते ९० फूट खोल कोसळल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रकचालक बालबाल बचावला आहे.

आज सकाळी झालेल्या अपघातात ट्रकचे मात्र मोठे नुकसान झाले आहेत. तब्बल पाच ते सहा तासानंतर बांभोरी तरुण तसेच नागरिकांच्या सहकार्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने हा आयशर ट्रक बाहेर काढण्यात आला. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार बांभोरी येथील सोपाळ कोळी यांच्या मालकीचा आयशर ट्रक (एमएच ०४ सीयू २२८८) रविवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामागाने जळगावहून पाळधीकडे जात होता. यादरम्यान बांभोरी जकातनाक्यापासून काही अंतरावर समोरुन येणार्‍या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात तसेच ब्रेक न लागल्याने चालक राजू माळी याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्यानंतर हा ट्रक थेट ८० ते ९० फूट खोल असलेल्या दरीत कोसळला.

तीन ते चार वेळा पलटी मारत हा ट्रक एका ठिकाणी अडकला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस स्टेशनचे ज्ञानेश्वर कोळी यांच्यासह बांभोरी येथील तरुण तसेच नागरिकांनी धाव घेतली. ट्रकमधील चालक राजू माळी यास ट्रकमधून बाहेर काढण्यात आले. यानंतर ट्रॅक्टर बोलावून ट्रॅक्टरच्या सहाय्याने तसेच बांभोरी तरुण, वाहनधारक यांच्या अथक परिश्रमाने तब्बल पाच तासानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास आयशरला बाहेर काढण्यात यशस्वी झाले.

 

Exit mobile version