Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओवैसींच्या मदतीने योगी पुन्हा मुख्यमंत्री झाले तर उत्तर प्रदेश सोडून जाईन — मुनव्वर राणा

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । “मुस्लीम ओवैसीकडे गेले आणि निवडणुकीनंतर योगी  पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी, मुन्नवर राणा उत्तर प्रदेश सोडून निघून जाईन,” अशी घोषणाही राणा यांनी एका मुलाखतीमध्ये केली.

 

आगामी २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकींची तयारी राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. युती, गठबंधनाच्या चर्चा सुरु झाल्या असल्या तरी एकमेकांवर होणारे आरोप प्रत्यारोप अजून काही थांबल्याचं चित्र दिसत नाही. असं असतानाच लोकप्रिय शायर मुनव्वर राणा यांनी   मोठी घोषणा केलीय.

 

एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसीमुळे योगी आदित्यनाथ पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले तर मी राज्य सोडून निघून जाईन, असं मुनव्वर राणा म्हणाले आहेत. भाजपा आणि ओवैसी हे असे दोन कुस्पीपटू आहेत जे केवळ लोकांना दाखवण्यासाठी एकमेकांविरोधात लढत आहेत. मतांचं ध्रुवीकरण व्हावं आणि त्याचा फायदा भाजपाला व्हावा असं या दोघांचा डाव असल्याचं, मुनव्वर राणा म्हणालेत.

 

सध्या उत्तर प्रदेशमधील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि ओवैसींकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात वर वर भांडतात असा आरोप मुनव्वर राणा यांनी केला आहे. मतांचे ध्रुवीकरण करुन त्याला लाभ भाजपाला मिळवून देण्यासाठी हे दोन्ही पक्ष प्रयत्नशील असतात असा टोलाही मुन्नवर राणा यांनी लगावला आहे. काही दिवसांपूर्वीच ओवैसी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाल्याचं पहायला मिळालं होतं.

 

काही दिवसांपूर्वीच ओवैसी यांनी उत्तर प्रदेशमध्ये लागू करण्यात आलेल्या  उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरण २०२१-२०३०  टीका केली होती.

Exit mobile version