Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओवेसींचा मोदी सरकारवर हल्ला

नवी दिल्ली / वृत्तसंस्था / भारतामधील १६०० हून अधिक कंपन्यांमध्ये एप्रिल २०१६ ते मार्च २०२० दरम्यान चीनने एक अब्ज डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक केली आहे. सरकारनेच जारी केलेल्या आकडेवारीमधून ही माहिती समोर आली आहे. यावरून आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेंसी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “हेच का ते सडेतोड उत्तर,” असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

“१५ जून रोजी चिनी सैनिकांबरोबर झालेल्या चकमकीत आपले २० जवान शहीद झाले. त्याच्या चार दिवसांनंतर १ जून रोजी चीनकडून ५ हजार ५२१ कोटी रूपये घेऊन चीनला जशास तसं उत्तर दिलं. आपल्या जवानांच्या बलिदानाचा हा अपमान आहे,” असं ओवैसी म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला.

Exit mobile version