Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओरियन सी.बी.एस.ई.शाळेत श्रावणी हरेल प्रथम

जळगाव –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन सी.बी.एस.ई. इंग्लिश मिडियम स्कूलच्या  विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालाची परंपरा कायम ठेवत शाळेत श्रावणी राजेश हरेल या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

ओरियन सी.बी.एस.ई. इंग्लिश मिडियम शाळेचा काल शुक्रवार दि. २२ जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या  इयत्ता दहावीच्या परीक्षेत  श्रावणी राजेश हरेल या विद्यार्थ्यानीने ९८.४०%  टक्के गुण मिळवून  प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.   ९७.०० %  टक्के गुण मिळवत  चिन्मय ललित तावडे या विद्यार्थ्याने द्वितीय स्थान मिळविले आहे. तसेच कोमल एकनाथ पाचपांडे या विद्यार्थिनीने  ९६.६० %    टक्के  गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. एकूण १६  विद्यार्थायानी शेकडा ९० टक्केच्या वर गुण संपादित केले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष   नंदकुमार बेंडाळे व संस्थेचे प्रशासकीय अधिकारी  शशिकांत वडोदकर   यांनी अभिनंदन केले आहे.  स्कूलच्या प्राचार्य सुषमा कंची व उपप्राचार्य माधवीलता सिट्रा यांनीदेखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.   शाळेची नियोजन बद्ध शिक्षण प्रणाली, शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन व विद्यार्थीची मेहनत या सर्वांच्या समन्वयातूनच आज हे यश प्राप्त होऊ शकले आहे असे मनोगत प्राचार्या  सुषमा कंची यांनी व्यक्त करत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version