ओरिऑनतर्फे तणावमुक्त यश या विषयावर ऑनलाइन वेबिनार

जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई. सोसायटी संचालित ओरिऑन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल तर्फे विध्यार्थी पालक व शिक्षक यांना दि.6 ऑक्टोबर रोजी तणावमुक्त यश या विषयावर ऑनलाईन वेबिनार घेण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते डॉ. संजीवकुमार पाटील, प्रसिद्ध भुलतज्ञ, दिग्दर्शक, अभिनेते, लेखक हे होते. त्यांनी तणावमुक्त यश संपादन करण्यासाठी एकूण सात पायऱ्या सांगून त्यांचे विश्लेषण केले. कोरोना संकटातून जात असताना ऑनलाईन शिक्षणाचा विध्यार्थी, पालक व शिक्षक यांना होणारा ताण कसा कमी करता येईल व हे शिक्षण आंनददाई कसे होईल या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी जवळपास ४ हजार विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी फेसबुक व झूम माध्यमातून सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळचे अध्यक्ष  सुधाकर सनांसे व त्यांचे सहकारी यांचेही सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी केले. प्रास्ताविक सिद्धेश्वर पाटील यांनी केले. यावेळी शाळेचे प्राचार्य संदीप साठे, उपप्राचार्य चंद्रकला सिंग हे उपस्थित होते. आभारप्रदर्शन हर्षल तायडे यांनी केले. सर्व शिक्षकवृंद यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Protected Content