ओमायक्रॉनच्या सामूहिक संसर्गास प्रारंभ

नवी दिल्ली वृत्तसंस्था | कोरोनावर लक्ष ठेवणारी समिती इन्साकॉगने ओमायक्रॉनने सामुहिक प्रसाराला सुरुवात केल्याची घोषणा केली आहे.

 

भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग सामुदायिक प्रसाराच्या टप्प्यात पोहोचला आहे. अनेक महानगरांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग वाढतानाच पाहायला मिळत आहे. ओमायक्रॉनपासून निर्माण झालेला दुसरा कोरोना व्हायरसचे रुग्ण भारतात सापडल्याचा दावा ब्रिटनने केला आहे. याचबरोबर युरोपमध्ये या नव्या व्हेरिअंटचा प्रसार वेगाने होत असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर इन्साकॉग़चा इशारा आला आहे. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज तीन लाखांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे.

Protected Content