Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओबीसी आरक्षण त्यांना परत मिळवून द्या : आ.गिरीश महाजन

जळगाव, प्रतिनिधी ।  ओबीसी समाजाची हक्काचे आरक्षण त्यांना परत मिळवून द्या अशी मागणी भाजपतर्फे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की,  काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण या संदर्भातील राज्य सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली. राज्य सरकारला देखील या गोष्टीची माहिती आहेच. परंतु, राज्य सरकारने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. खरंतर प्रतिक्रिया देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या हातात ठोस काही असणे आवश्यक असते. त्यांच्याकडे नाही म्हणून त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळले.   दि. १२  डिसेंबर २०१९  या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी राज्य सरकारला ओबीसी आरक्षण संदर्भाने  काही आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला बजावून सांगितले होते की, लवकरात लवकर राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठण करावे.  राज्यातील ओबीसी समाजाचा इम्प्रीकल डाटा जमा करून तो तात्काळ कार्यालयास सादर करावा. न्यायालयाच्या या आदेशाला जवळपास पंधरा महिने झाले मात्र अजूनही सरकारने साधे राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन  देखील केलेले नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे. १२  डिसेंबरनंतर देखील महा विकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने जवळपास दहा ते बारा तारखा दिल्या. २१  तारखेला आपला सहकारी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पोहोचता करून न्यायालयात हजर राहिले नाही आणि मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकारात स्वतः जातीने लक्ष घातले आहे गेल्या पंधरा महिन्यात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास पाच ते सात वेळा पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाची गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा च्या वतीने अनेक वेळा पत्र दिले आमच्या काही पत्रावर राज्य सरकारकडून उत्तर आले नाही सरकार कडून त्यावर कोणतीही कारवाई देखील जाहीर करण्यात आली नाही मुख्यमंत्र्यांना विरोधकांची जराही चिंता नाहीच मात्र ओबीसी समाजाला देखील तुम्ही शुल्लक समजत आहात एवढेच नाही तर मुख्यमंत्री मोर्चा कडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला गेला याचा फटका ओबीसी समाजाला बसला आहे गेली पंधरा महिने सरकार फक्त पोटात जाऊन पुढची तारीख मागत होते भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा राज्य शासनाला चिथावणी देत आहे लवकरात लवकर यावर ठोस कारवाई करा तसे झाले नाही तर आंदोलन शिवाय दुसरा पर्याय होणार आहे लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाला दिलेले हक्काचे आरक्षण मिळवून देऊ आमच्या ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळणार नाही तोवर आम्ही शांत बसणार नाही माजी मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिप अध्यक्षा रंजना पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष जयेश भावसार, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन आदी उपस्थित होते.

 

 

Exit mobile version