Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी बहुजन समाजातर्फे १ डिसेंबर रोजी मोर्चा (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषद जळगाव जिल्हा आयोजित ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा आयोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी १ डिसेंबर २०२० रोजी जळगाव शहरात मोर्चा काढण्याबाबत ठराव करण्यात आला.

समस्त ओबीसी समाज बांधवाच्या उपस्थित ओबीसी आरक्षण ह्या विषयावर विविध ओबीसी जातीतील मान्यवरांनी आपापली मते मांडली. तसेच बैठकीच्या अध्यक्षस्थानी समता परीषदेचे नाशिक विभागाचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक होते. त्यांनी आपल्या मनोगतात जळगाव जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुक्यातून हाजारोच्या संख्यने ओबीसी आरक्षण बचाव संदर्भात मोर्चे येत्या आठवडय़ात काढून दिनांक १ डिसेंबर रोजी जळगाव शहरात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले. या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात येतील. ओबीसी बांधवानी मोठ्या संख्येने या मोर्चांस उपस्थित राहावे असे अहवान करण्यात आले. ह्या बैठकीला विभागीय संघटक अनिल नळे, सरचिटणीस अरूण थोरात, विधी तज्ञ म. प्रतीक कर्डक, जिल्हा अध्यक्ष सतिष महाजन, निरीक्षक म.शालीग्राम मालकर, मिडिया प्रमुख संतोष पुंड, माजी आमदार हरिभाऊ महाजन, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष म.विजय महाजन, बहुजन क्रांती परिषदेचे मुकुंद सपकाळे, शिंपी समाज अध्यक्ष मुकुंद मेटकर, नाभिक समाज अध्यक्ष म. किशोर सुर्यवंशी, परीट समाजाचे अध्यक्ष विवेक ठाकरे, सुतार समाजाचे अध्यक्ष चंद्रशेखर कापडे, भावसार समाजाचे अध्यक्ष राजेंद्र भावसार, म.पृथ्वीराज चव्हाण, म. प्रभाकर भालेराव, प्रकाश महाजन, भिकन सोनवणे, महिला प्रतिनिधी म्हणून सरीता कोल्हे, वैशाली महाजन, नगरसेविका सरीता नेरकर, आरती शिंपी, निवेदिता ताठे, सुनिता चौधरी, ज्योती महाजन यांच्या सर्व तालुका व शहर अध्यक्ष व जिल्हा व तालुका प्रतिनिधी व ओबीसी बांधव उपस्थित होते. कार्यक्रम सूत्रसंचालन जिल्हा कार्यध्यक्ष वसंत पाटील यांनी केले.

भाग १

भाग २

 

 

Exit mobile version