Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘ओबीसी आरक्षण बचाव’तर्फे जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी ।अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत काढण्यात आला.

ओबीसी प्रवर्गाच्या विविध मागण्यांसाठी गुरूवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. समता परिषद व जिल्हयातील इतर ओबीसी संघटनांना संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या मोर्चात

ओबीसी प्रवर्गाच्या विविध मागण्यांसाठी गुरूवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. समता परिषद व जिल्हयातील इतर ओबीसी संघटनांना संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या मोर्चात

जिल्हा बँकेचे अध्यक्ष रोहिणी खडसे शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ भारत मुक्ती मोर्चाचे मुकुंद सपकाळे शिवसेना शहर प्रमुख शरद तायडे समता परिषद विभागीय सरचिटणीस अनिल नाळे शालिग्राम मालकर समता परिषद महिला जिल्हाध्यक्ष शहर सरिता ललित कोल्हे ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष वैशाली महाजन जिल्हाध्यक्ष पश्चिम सतीश महाजन जिल्हाध्यक्ष पूर्व सचिन चौधरी जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील जिल्हा उपाध्यक्ष भूषण महाजन बारा बलुतेदार संघाचे प्रतिनिधी तचंद्रशेखर कापडे मंगला बारी भारती काळे ताठे अनाडी फिरोज शेख नाना भाऊ महाजन मेटकर किशोर सूर्यवंशी नेहा जगताप जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश महाजन श्याम पाटील माळी विभागीय सरचिटणीस आरती शिंपी रवींद्र पगारे जिल्हाध्यक्ष सतीश वाणी वाणी समाज अध्यक्ष प्रकाश बाविस्कर, भारती कृष्णा शिंपी गुलाब सोनवणे, मनोहर महाले शांताराम चौधरी उत्तम माळी , अर्जुन माळी, धनराज माळी, पी ओ महाजन, विजया नेरकर, संजय पाटील, भूषण महाजन, ज्ञानेश्वर महाजन, संजय विसपुते, मंगला बारी, वंदना बारी, सुषमा चौधरी भारती काळे सरिता माळी, भारती म्हस्के, निवेदिता ताठे, प्रेरणा महाजन, वैशाली महाजन, फिरोज शेख, नाना भाऊ महाजन, प्रभाकर महाजन, मुकूंद मेटकर, किशोर सूर्यवंशी, नेहा जगताप, प्रकाश ओंकार महाजन, श्याम पाटील, गुलाब सोनवणे, धनराज माळी, आरती शिंपी, खंडू माळी पी ओ महाजन, चंद्रकांत महाजन मयूर बारी, विवेक महाजन दगडू माळी भास्कर पाटील, विष्णू भंगाळे डॉक्टर स्नेहल फेगडे, राजेश वाळके, राजेश काळे महेंद्र पाटील, एडवोकेट नेमचंद येवले, बिपिन सर, हरीश येवले, विशाल काळे, सचिन पाटील, सचिन महाजन, सुरेश अत्तरदे दिनेश पाटील, राजेंद्र महाजन, मुकेश भाई, भीमराव मोरे,  रवींद्र नेरपगार , विजय वाणी, निलेश पंडित, सतीश वाणी, किरण पाटील,  भिकन बोरसे, किरण माळी, सुभाष पाटील, कैलास जाधव, गोविंद वाघ भगवान सोनवणे, पिरा महाजन, ज्ञानेश्वर माळी, बापू सावरकर, दादा भाऊ माळी, संजय महाजन, शरद गीते, पिंटू महाजन, रोहित महाजन, ज्ञानेश्वर महाजन, प्रकाश माळी, जिभाऊ माळी, धनराज माळी, दिगंबर पाटील, शिवाजी पाटील, एकनाथ पाटील आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी अनेकांनी घोषणांचे फलक हाती घेत जोरदार घोषणा दिल्या.

अशा आहेत मागण्या

निवेदनात ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या वतीने तज्ञ वकील नियुक्त करणे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणे, ओबीसी जात निहाय जनगणना करणे, उच्च शिक्षणाकरीता २७ टक्के आरक्षण, इतर प्रवर्गाप्रमाणे ओबीसी विदयार्थ्यांना १०० टक्के स्कॉलरशिप मिळाली पाहीजे, राज्य व केंद्र सरकारच्या नोकर भरती मध्ये प्रवर्गनिहाय २७ टक्के अधिकारी, कर्मचारी नेमावेत, ओबीसी आरक्षणाची अंमलबाजवणी काटेकोर व्हावी आदी मागण्या नमूद करण्यात आल्या.

यावेळी पुण्यातील आरक्षण बचाव मोर्चा प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक करण्यात आली त्याचा निषेध म्हणून स्वतंत्र चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

 

भाग १

भाग २

भाग ३

Exit mobile version