Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओबीसींच्या प्रलंबित मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना   मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील ओबीसींच्या विविध मागण्या राज्य व केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. यात राज्या जूनी पेन्शन योजना लागू करावी, ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी, मागासवर्गीय तसेच अल्पसंख्यांक समाजाशी संलग्न विविध महामंडळाची कर्जे माफ करुन शासन दरबारी आणि कोर्टात असलेल्या केसेस त्वरीत मागे घ्याव्यात. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले आणि आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहिर करावा. निवडणूकांमध्ये ईव्हीएम चा वापर बंद करण्यात यावा. महाविकास आघाडीच्या काळात जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृह सुरु करण्याच्या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी. अश्या मागण्या केल्या आहेत.

निवेदन देतांना काँग्रेसचे विभागीय उपाध्यक्ष डॉ. जगदीश पाटील, ओबीसी जिल्हाध्यक्ष डी.डी. पाटील, ओबीसी शहराध्यक्ष सखाराम मोरे, ज्ञानेश्वर कोळी, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, ओबीसीचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष निखिल चौधरी, अमळनेरचे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, संजय विसावे, राजू चौधरी, मुक्ताईनगर शहराध्यक्ष आरिफ शेख, सचिव हर्षल पाटील, आदी उपस्थित होते.

Exit mobile version