Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ऑलम्पिक 2032 साठी ऑस्ट्रेलियाची निवड

 

टोक्यो : वृत्तसंस्था । ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेन शहराला 2032 च्या ऑलम्पिक स्पर्धा खेळवण्याचा मान देण्यात आला आहे. हा मान ब्रिस्बेनला मिळणार असल्याची चर्चा आधीपासूनच होती.

 

यंदाच्या ऑलम्पिक स्पर्धांना सुरु होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे. टोक्यो येथे 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पार पडणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धा मागील वर्षी कोरोनामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आलया होत्या. यंदा जपान सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने मिळून या स्पर्धा सर्व काळजी घेऊन खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच 2032 साली ऑलम्पिक खेळवण्यात येणारा देश फायनल करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने याबाबतची घोषणा केली आहे.

 

ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी व्हिडीओ कॉन्फ्रसमध्ये दिलेल्या माहितीत म्हटलं, ‘आम्हाल याआधी ऑलम्पिक खेळ कसे खेळवायचे, कसं आयोजन करायचं याचा अनुभव आहे. 2024 मध्ये पॅरिस आणि  2028 मध्ये लॉस एंजेलीसमध्ये ऑलम्पिक खेळ होणार आहेत. त्यानंतर 2032 साठी ब्रिसबेनने नव्या बिडिंग सिस्टममध्ये विजय मिळवला.  त्यामुळे हा मान आम्गहाला मिळाला आहे.”

 

ऑलम्पिक सारखी भव्य स्पर्धा खेळवण्याचा मान ऑस्ट्रेलियाला तिसऱ्यांदा मिळाला आहे. याआधी 1956 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे ऑलम्पिक खेळ खेळवण्यात आले होते. तर त्यानंतर 2000 साली सिडनी येथे ऑलम्पिक खेळांचे आयोजन झाले होते. त्यानंतर आता 32 वर्षांनी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला हा मान मिळाला आहे.

 

2032 च्या ऑलम्पिक खेळांसाठी ब्रिसबेनचे नाव घोषित करताच तेथील नागरिकांना खूप आनंद झाला. त्यांनी ऑस्ट्रेलियात अनेक ठिकाणी जल्लोष करत फटाके फोडले.

 

Exit mobile version