Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ऑनलाईन जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सोमवार ३ मे रोजी ऑनलाईल जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. 

नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत तालुका, जिल्हाधिकारी, महानगरपालिका व विभागीयस्तरावर लोकशाही दिन दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (video Conferancing) आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. 

त्यानुसार जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिन 3 मे, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (Video Conferancing) होणार आहे. यादिवशी लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणांबाबत आढावा बैठक देखील होणार आहेत. जिल्ह्यातील संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील विभागांचा प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन व त्याबाबतचा निपटारा करुन यादिवशी आवश्यक त्या अहवालासह सकाळी 11.00 वाजता उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Exit mobile version