Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ऑगस्टमध्ये ब्रिटन होणार कोरोनामुक्त

 

 

लंडन : वृत्तसंस्था ।  “येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ब्रिटन करोनामुक्त झाला असेल”, असा दावा ब्रिटनच्या लसीकरण टास्क फोर्सचे मावळते अध्यक्ष क्लाइव्ह डिक्स यांनी केला आहे.

 

जगभरात कोरोनाचा फैलाव झालेला असताना त्याला नियंत्रणात कसं आणायचं? याच विवंचनेत सर्व राष्ट्र आहेत. मात्र, ब्रिटनमध्ये चित्र वेगळं आहे.  . ब्रिटनमध्ये फायझर आणि मॉडेर्नासोबतच काही प्रमाणात ऑक्स्फोर्डने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचे डोस दिले जात आहेत.  ब्रिटनकडून करण्यात आलेला हा दावा समस्त जगासाठीच एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल.

 

क्लाइव्ह डिक्स यांनी सांगितल्यानुसार, युकेमध्ये आत्तापर्यंत ५ कोटी १० लाख नागरिकांना लसीकरण पूर्ण झालं आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत युकेमधल्या प्रत्येकाला करोना लसीचा किमान एक डोस तरी दिला गेलेला असेल. त्यामुळे तोपर्यंत ब्रिटनने आपल्या सर्व लोकांना सध्या माहिती असलेल्या कोरोनाच्या सर्व प्रकारांपासून संरक्षित केलेलं असेल. देशातल्या तरुण लोकसंख्येपैकी किमान अर्ध्या लोकसंख्येला लसीकरण करून ब्रिटन या गटासाठी सर्वात वेगाने लसीकरण करणारा दुसरा देश ठरला आहे.

 

 

जगभरात लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारतात देखील वेगाने लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. मात्र, लसीच्या

अनुपलब्धतेमुळे लसीकरण मोहिमेमध्ये अडथळे येत आहे. भारतात आत्तापर्यंत १७.३५ कोटींहून अधिक डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवण्यात आले आहेत. भारताच्या लोकसंख्येच्या मानाने ही संख्या १५ टक्क्यांच्या जवळपास असल्यामुळे हा आकडा मोठा मानला जात आहे. मात्र, भारतात लसीकरणापेक्षाही जनतेनं नियम पाळणं जास्त महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Exit mobile version