Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ऐतिहासिक, रोमांचक आणि प्रत्येक भारतीयांची छाती गर्वाने फुलून यावी असा क्षण : शिवसेना

मुंबई (वृत्तसंस्था) शरयू नदीने तेव्हा राममंदिरासाठी गोळ्या झेलणाऱ्या शेकडो कारसेवकांना पोटात घेतले. रामभक्तांच्या रक्ताने लाल झालेल्या शरयू नदीच्या तीरावर भव्य मंदिराचा संकल्प पूर्ण होत आहे. हा ऐतिहासिक, रोमांचक आणि प्रत्येक भारतीयांची छाती गर्वाने फुलून यावी असा क्षण आहे, असे आज सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

 

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, शरयू नदीने तेव्हा राममंदिरासाठी गोळ्या झेलणाऱ्या शेकडो कारसेवकांना पोटात घेतले. रामभक्तांच्या रक्ताने लाल झालेल्या शरयू नदीच्या तीरावर भव्य मंदिराचा संकल्प पूर्ण होत आहे. हा ऐतिहासिक, रोमांचक आणि प्रत्येक भारतीयांची छाती गर्वाने फुलून यावी असा क्षण आहे. रामायण हा भारतीय जनतेचा प्राण आहे. राम हा रामायणाचा प्राण आहे. राम हा मर्यादापुरुषोत्तम, एकवचनी आहे. राम म्हणजे त्याग, राम म्हणजे साहस आहे. राम म्हणजे आपल्या देशाची एकात्मता आहे. अशा रामाचे मंदिर त्याच्याच अयोध्या नगरीत, त्याच्या जन्मस्थानी व्हावे यासाठी हिंदूना मोठा लढा द्यावा लागला. त्या लढ्याची सांगता आज होत आहे.
बाबरी पाडली त्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. या कृतीने बाळासाहब ठाकरे हिंदूह्रदयसम्राट बनले. आजही ते स्थान अढळ आहे. सगळ्याच्या त्यागातून, संघर्षातून रक्त आणि बलिदानातून राममंदिर या मातीत कारसेवकांच्या त्यागाचा गंध आहे हे विसणारे रामद्रोही ठरतील. राममंदिर भूमीपूजनाच्या प्रश्नाने राजकारही कायमचे संपावे. श्रीरामाचीही तीचं इच्छा असेल, सारा देश आज एकसुरात गर्जत आहे. हा लढा प्रत्यक्ष भूमीवर झाला आणि न्यायालयातही झाला. रामामंदिर भूमिपूजनाचे पहिले निमंत्रण अयोध्या न्यायालयीन लढाईतीली मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारी याला पाठवण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराच्या बाजून ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर रामजन्मभूमीच्या वाद संपलेला आहे. इक्बाल अन्सारी हा एकटा नव्हता, पण न्यायालयात राममंदिराविरोधी लढा देणाऱ्या बाबरी अॅक्शन कमिटीचा तो एक प्रमुख चेहरा होता. त्याच्या पाठीमागे अनेक इस्लामी संघटनांनी मोठी शक्ती उभी केली होती. अन्सारीने न्यायालयातली लढाई 30 वर्षे खेचली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व प्रकरण तारखांच्या गुंत्यात अडकून पडले. पण न्या. रंजन गोगोई यांनी रामाला त्या गुत्यातून बाहेर काढले, असेही अग्रलेखात म्हटले आहे.

Exit mobile version