Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात विशेष प्राविण्य पदके व बक्षीस वितरण सोहळा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | खान्देश काँलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे फिरोज पठाण (गटशिक्षणाधिकारी जळगाव) व दत्तात्रय चौधरी (एम.जे.काँलेज), शशिकांत वडोदकर ( के.सी.ई.सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी ), पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक मंडळ, गुरूवर्य.प.वि.पाटील प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ व २०२२-२३ मध्ये विविध स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य पदके व बक्षीस आणि पुरस्कार प्रदान करण्यात आले.

इयत्ता आठवी या वर्गातील आदर्श विद्यार्थी अथर्व ब्रम्हक्षत्रिय व आदर्श विद्यार्थीनी म्हणून प्रणाली नारखेडे यांना स्मृती चीन्ह देऊन गौरविण्यात आले. शालांत परिक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या कुमारी.हनी रवींद्र तायडे या विद्यार्थ्यीनीचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. माध्यमिक शालांत परिक्षा मार्च २०२२ मध्ये विविध विषयांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेले विद्यार्थी चेतन चंद्रकांत पाटील, वेदांत राजू पाटील, विशाखा डिगंबर पाटील, स्नेहा जितेंद्र जाधव, प्रियंका विनोद चौधरी, विष्णू किरण सोनवणे, गिरीजा शशिकांत पाटील इ.विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

याप्रसंगी फिरोज पठाण साहेब यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग राणे यांनी तर आभार प्रदर्शन पूनम कोल्हे‌ यांनी मानले.

Exit mobile version