Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एस.टी कर्मचारी संपास लोकसंघर्ष मोर्चाचा जाहीर पाठिंबा

अमळनेर, प्रतिनिधी | विविध मागण्यासाठी सुरू असलेला एस.टी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपात सहभागी होऊन लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने आज जाहीर पाठिंबा देण्यात आले आहेत. यावेळी पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.

राज्य शासनात विलिनीकरण करून विविध मागण्या मान्य कराव्या यासाठी एस.टी कामगारांकडून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आले आहे. मात्र राज्य सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने ह्या मागण्या मान्य न होता‌ लांबणिवर जात आहे. यामुळे संपाचा स्वरूप तीव्र स्वरूपात पहायला मिळत आहे. दरम्यान लालपरीने खेड्यातील हजारो विद्यार्थी, मजुर, वृद्ध, आणि महिलांसाठी एक हक्काची आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन आहे. ग्रामिण जनतेसाठी एस.टी जणु आत्माच होय. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा नारा होता *“खेड्यांकडे चला’’* मात्र आधुनिक काळात शहर आणि खेड्यांची नाळ जोडुन ठेवण्याचे कार्य *१९४८* या वर्षापासुन एसटीने केलेले आहे. एसटीचे एवढे महत्व असतांनासुद्धा एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करुन ऐन दिवाळीच्या वेळेत एसटीची चाके थांबली आणि अजुनही एसटी कर्मचाऱ्यांचा लढा सुरुच आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा चालु असलेला संघर्ष फक्त पगारवाढीसाठी नसुन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी आहे. कारण एसटी म्हणजे राज्यशासनासाठी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी आहे. करोडो लोकांचे एसटी हे प्रवासाचे साधन आहे. आणि एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण झाल्यास. १७ % असलेला प्रवासी कर रद्द होईल, टोल टॅक्स द्यावा लागणार नाही, महाराष्ट्र सरकारचा २७ % डिझेल कर रद्द होईल,
वरील पैसा वाचला म्हणजे तिकीट दरात जवळपास ४०% कपात होऊ शकते. सोमवार , ८ नोव्हेंबर पासुन राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आणि त्यांच्या मागण्या रास्त आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या समस्या थांबल्या पाहिजेत. व त्यांच्या मुलाबाळांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. त्यांना चागले जगता यावे हा लोककल्याणकारी राज्याचा महत्वाचा घटक असतांना मात्र त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करुन गुन्हे दाखल करणे हा राज्यघटनेच्या लोककल्याणकारी राज्य निर्मिती या घटकाच्या विरोधी आहे. याचा आम्ही तिव्र निषेध करीत आहोत. तरी ना. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व मा.ना. परिवहन मंत्री अनिल परब यांनी या सर्व रास्त मागण्यांचा सहानुभुती पुर्वक विचार करुन लवकरात लवकर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनातील सर्वच मागण्या मंजुर कराव्या. यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना लोकसंघर्ष मोर्चा पाठिंबा देत आहे. वेळ पडल्यास लोक संघर्ष मोर्चा ह्या आंदोलनात सक्रिय उतरेल असा ईशारेचा पत्र देण्यात आले आहे.

यावेळी लोक संघर्ष मोर्चा चे पन्नालाल मावळे सह प्रा. अशोक पवार , बन्सिलाल भागवत गुरुजी, संदिप घोरपडे, रियाज शेख, संजय पवार, दयाराम पाटील, कलीम शेख, बालीक पवार, गणेश चव्हाण, शराफत अली, मुस्तफा भैया ए टू झेड, शेख कलीमोद्दीन हाजीजलालोद्दीन, रोशन मावळे व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version