एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे मुस्लीम कुटुंबियांना मिळाली इदी

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | एक मुस्लीम दाम्पत्य ईद साजरी करून परत येत असतांना त्यांची नजर चुकीने बसमध्ये बॅग राहिली; मात्र बस कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणा आणि प्रसंगावधानामुळे   बॅग या कुटुंबीयना परत मिळाली आहे.

 

मनमाड आगाराच्या मालेगाव ते जळगाव या बसने एक मुस्लीम दाम्पत्य ईद साजरी करून परत येत असतांना त्यांची नजर चुकीने बसमध्ये बॅग राहिली. ही बाब शिवशाही बसवरील चालक वाहकांचा लक्षात येताच त्यांनी संबंधित वाहक चालकाशी संपर्क साधून त्यांची बॅग परत मिळवून देण्यास मदत केली आहे.

आज, गुरुवार दि. ५ मे रोजी मालेगाव येथील रहिवासी शेख साजिद शेख् शकील व त्यांच्या पत्नी या ईद साजरी करून मनमाड आगाराच्या एसटी बसने मालेगावहून सासुरवाडीस जळगावला येण्यासाठी निघाले होते.

धुळे बस स्थानकावर नास्ता करण्यास गेले असता त्यांची बॅग मनमाड जळगाव बसमध्ये राहून गेली. सदर बस निघून गेल्यावर त्यांनी शोधशोध सुरु केली. यावेळी जळगाव आगाराची शिवशाही बस धुळे बस स्थानकावर आली असतांना त्यावरील वाहक गोपाळ पाटील (क्र. १३००५ ) यांनी त्या प्रवासांना दिलासा देऊन त्यांच्या तिकिटाला तपासून संबंधित आगारास संपर्क साधला. त्या बस वाहकाशी संपर्क साधून बॅग शोधण्याची सूचना दिली.

या अनुषंगाने मनमाड आगाराचे चालक बी. पी. कूनगर आणि वाहक ई एस. पी. सोलंकी यांनी त्यांच्या बस क्र. एमएच १४ बीटी ४२७७ मध्ये तात्काळ बस तपासणी करून बॅग शोधली व दूरध्वनीद्वारे संबंधित घटना कळविली. याप्रसंगी या दांपत्यास खूप आनंद झाला. या बॅगमध्ये महत्वपूर्ण कागदपत्रे व सामान असल्याने त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Protected Content