एरंडोल शेतकी संघावर पालकमंत्री ना. पाटील यांच्या पॅनलचा दणदणीत विजय

एरंडोल- -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेतकरी सहकार संघाची निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता कायम राखण्यात यश मिळाले आहे. सहकार पॅनलला १५ पैकी १५ जागावर विजय प्राप्त झाला.

 

कृषी उत्पन्न बाजार समिती शिंदे गटाची सत्ता आल्यानंतर लागलीच लागलेल्या शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सहकारात नेतृत्व सिध्द झाले आहे. निवडणुकीत सर्व नवनिर्वाचित संचालकांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार उपस्थित होते.

 

सहकार पॅनलचे विजयी उमेदवार असे-

 

सोसायटी मतदार संघ -या मतदारसंघात एकूण ११२ मतदान झालेले होते त्यापैकी संजय जाधव ७७, धनराज महाजन ७७, प्रकाश महाजन ७८, भगवंतराव पाटील ८१, गजानन पाटील ७४, सुमनताई पाटील ७०, पवन सोनवणे ७३, तसेच महिला मतदारसंघातून सोनल संजय पवार व प्रतिभा दिनेश पाटील या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. व्यक्तिश: मतदारसंघात एकूण ५५६ मतदान झाले होते त्यात रवींद्र चव्हाण ४८१, ज्ञानेश्वर महाजन४६९, विनोद पाटील ४२२, अशा बहुमतांनी यांचा विजय झालेला आहे. अनुसूचित जाती जमाती मतदार संघ मधून कल्पनाताई आहेरे यांना ६७८ पैकी ५७८, एन.टी. मतदारसंघ रवींद्र जाधव यांना ५४५ आणि ओबीसी मतदारसंघ संभाजी चव्हाण यांना ६१८ मतदान मिळाले असून विजय प्राप्त झाला आहे. सहकार पॅनलच्या १५ पैकी १५ उमेदवार हे दणदणी मतांनी विजय झालेमुळे विरोधी शेतकरी पॅनलच्या सुपडा साफ झाला आहे.

 

 

सहकार पॅनलला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन , आ.चिमणराव पाटील, आ.राजु मामा भोळे, मार्गदर्शनाने व जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, यांच्या मार्गदर्शनाने तसेच जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. आबा पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, निलेश पाटील, तालुकाप्रमुख गजानन पाटील, रमेश राजाराम पाटील, रवींद्र जाधव, एरंडोल पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील, सुदाम पाटील, अरविंद मानकरी यांच्या सहकाऱ्याने  २० वर्षापासूनची सत्ता राखण्यात ना.गुलाबराव पाटील यांना यश मिळालेले आहे.

 

……गतवैभव प्राप्त करुन देणार: ना.गुलाबराव पाटील

 

शेतकी संघाला गतवैभव प्राप्त करुन देणार असून अनेक अडचणीत जिल्हयातील शेतकी संघ आहेत काही ठिकाणी राजकीय पाठबळाची आवश्यकता असल्याने प्रशासकिय पातळीवर गतीमान निर्णय घेऊन शेतकी संघ नावारुपास आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. शेतकी संघामार्फत शेतकऱ्यांचा घामाचा पिकविलेला माल विक्री करुन शेतकऱ्यांना जास्ती जास्त कसा मिळेल हे प्राधन्य क्रमांने पाहिले जाईल. धान्य खरेदी देखील वेळेवर सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले जाणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.

Protected Content