Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एरंडोल शहरात नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती साजरी

 

एरंडोल, प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील कार्यक्रमात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी व राष्ट्रीय ओबीसी फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष प्रकाश महाले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून व माल्यार्पण करण्यात आले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं जीवनावर आधारित समायोचित मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी श्रीकांत महाजन, जहीरूददीन शेठ, निळकंठ आहिरे, पत्रकार उमेश महाजन, रवी मोरे, रमेश मोरे, साजिद शेख, प्रवीण अहिरे, संकेत लोहार, प्रकाश महाजन, राजेंद्र चौधरी, रमेश सोनार, आबा गांगुर्डे, पवन चौरसिया, नितीन जयस्वाल, निलेश जगताप, सदाशिव पाटील, गणेश गांगुर्डे, अंबादास गारगे, दीपक सोनार, दिनेश परदेशी, रवींद्र चव्हाण, रोशन अहिरे, विजय कासार नितीन कुवर, सुभाष कुवर , लोकेश महाले, शिवादाम पाटील, जयेश महाजन, रोहित मोरे, शैलेश, हिरे, उत्तम महाजन, अमोल शिंपी, तुषार शिंपी, जीवन पाटील जावेद शेख ,नकुल टेलर, मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Exit mobile version