Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एरंडोल येथे मैत्री सेवा फाउंडेशन आयोजित निसर्ग सप्ताहाचा शुभारंभ (व्हिडिओ)

एरंडोल प्रतिनिधी  एरंडोल येथे मैत्री सेवा फाउंडेशनतर्फे आयोजित निसर्ग सप्ताह अभियानाला सुरुवात झाली. या अभियानाचे उद्घाटन एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी फीत कापून व एक रोप भेट देऊन केले. 

 

निसर्ग सप्ताहांतर्गत मैत्री सेवा फाउंडेशन हे नागरिकांना वृक्षाचे रोप विकत देणार आहेत व त्याच बरोबर जो हे रोप विकत घेईल त्याकडून एक प्रतिज्ञा फॉर्म भरून घेत आहेत. यात रोपाची देखभाल परिवाराप्रमाणे करावी, त्याची आपल्या घरातील सदस्याप्रमाणे काळजी घ्यावी, निगा राखावी अश्या आशयाची प्रतिज्ञा यात आहे. या उपक्रमाच्या  उद्घाटन प्रसंगी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी गाव असो वा शहर वृक्ष लागवडीवर भर दिला पाहिजे. सगळे मिळून वृक्ष लावूया वातावरण स्वच्छ आणि प्रसन्न बनवूया असे निसर्गप्रेमी मार्गदर्शन केले. दरम्यान यावेळी सदर अभियानाअंतर्गत कमीत कमी पाच वृक्षांची (रोपांची) एक वर्षापर्यंत योग्य ती काळजी घेऊन निगा राखल्यास मैत्री सेवा फाउंडेशनच्या ‘निसर्ग मित्र’ या पुरस्काराने त्या व्यक्तीस विशेष सन्मानित करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. या अगोदर देखील मैत्री फौंडेशन कडून विविध प्रशंसकीय कार्य करण्यात आले आहेत. याप्रसंगी शहरातील शांताराम महाजन, प्रल्हाद महाजन, साई मेडिकलचे संचालक भुषण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर महाजन, पियुष चौधरी, पंकज पाटील , करण पाटील,  साहिल पिंजारी , शुभम महाजन, मनोज महाजन, संतोष जैस्वाल,ज्ञानेश्वर महाजन , तुषार महाजन, निखिल शेंडे , जयेश पाटील , हेमंत पाटील , प्रितेश पाटील , निलेश बाकळे व सर्व मैत्री फाऊंडेशनचे सदस्य व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

 

 

 

Exit mobile version