Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एरंडोल येथे बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा

एरंडोल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | एरंडोल तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडून एरंडोल  शहर व तालुका  शिवसेना व युवा सेनेच्या वतीने स्व. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिवस शिवसेना तालुका कार्यालय येथे साजरा

 

 

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार दि. १७ नोव्हेंबर रोजी एरंडोल तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातर्फे  बाळासाहेब अमर रहे यासह इतर घोषणांनी बाळासाहेबांचा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी बाळासाहेबांच्या फोटोला माल्याअर्पण करून अभिवादन करण्यात  आले. याप्रसंगी तालुका  समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश अण्णा महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश दादा पाटील, महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदाताई पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, माजी नगराध्यक्ष किशोर भाऊ निंबाळकर, डॉक्टर सतीश देवकर, युवा सेना तालुकाप्रमुख गुलाब पाटील, युवा सेना शहर प्रमुख प्रमोद महाजन, माजी नगरसेवक नितीन बिर्ला, दक्षता समिती सदस्य परेश बिर्ला, राजेंद्र ठाकूर, अनिल महाजन, हनुमंत खेड्याचे सरपंच किशोर आप्पा पाटील, उपशहर प्रमुख सुनील मराठे, महेश महाजन, कुणाल पाटील, संदिप बोढरे,अरिफ मिस्तरी, ऋषिकेश शिंपी आदी उपस्थित होते.

Exit mobile version